vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

श्रद्धा वालकर हत्याकांड ची आरोपी आफताब पूनावाला कडून पॉलिग्राफ टेस्ट मध्ये पश्चाताप विना कबुली; अन्य मुलींसोबतचे संबंधही केले मान्य

श्रद्धा वालकर हत्याकांड ची आरोपी आफताब पूनावाला कडून पॉलिग्राफ टेस्ट मध्ये पश्चाताप विना कबुली; अन्य मुलींसोबतचे संबंधही केले मान्य…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

आफताफने आपल्या पॉलिग्राफ टेस्ट मध्ये श्रद्धा वालकरचा खून केल्याची कबुली देतानाच तिच्या शरीराचे लहान लहान तुकडे करून दिल्ली आणि गुरूग्राम मध्ये जंगलात ते फेकल्याची देखील कबुली दिली आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांड  ही सुन्न करणारी कहाणी म्हणजे निर्दयीपणाचा कळस आहे. आता या हत्याकांडातील आरोपी Aftab Amin Poonawalla याने हत्येची कबुली देऊन आणि फाशी झाली तरी बेहत्तर म्हणत क्रुरतेची परिसीमा गाठली आहे. सहा महिन्यांपूर्वी आपल्या 27 वर्षीय लिव ईन पार्टनरचा खून करून आता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोबतच अनेक मुलींसोबत आपले संबंध होते याची देखील माहिती पॉलिग्राफ टेस्ट मध्ये दिल्याचं  च्या सूत्रांनी दिली आहे. दिल्ली मध्ये काल (29 नोव्हेंबर) आफताबची पॉलिग्राफ टेस्ट झाली आहे.

आफताफने आपल्या पॉलिग्राफ टेस्ट मध्ये श्रद्धा वालकरचा खून केल्याची कबुली देतानाच तिच्या शरीराचे लहान लहान तुकडे करून दिल्ली आणि गुरूग्राम मध्ये जंगलात ते फेकल्याची देखील कबुली दिली आहे. FSL च्या सूत्रांच्या माहितीनुसार आफताब ला या गुन्ह्याबाबत कोणताही पश्चाताप नाही. श्रद्धाचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करणं हा आपल्या प्लॅनचाच एक भाग असल्याचं त्याने म्हटलं आहे. आता आफताबला 5 डिसेंबरला नार्को अ‍ॅनालिसिस टेस्ट साठी नेलं जाणार आहे.

दिल्ली न्यायालयाने आफताबच्या नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ टेस्टला परवानगी दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते की, आफताब तपासकर्त्यांची दिशाभूल करत आहे आणि चालू तपासात सहकार्य करत नाही. दिल्ली पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खून प्रकरणाचा छडा लावला आहे. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या बेपत्ताच्या तक्रारीच्या आधारे 12 नोव्हेंबर रोजी आफताब पूनावालाला त्याच्या मैत्रिणीची निर्घृण हत्या केल्याबद्दल अटक झाली.

 

 

संबंधित पोस्ट

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दर्जेदार सेवा द्या- अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे

राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन, 2024 साली होणार पंतप्रधान’

सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर एकत्र होणार सुनावणी…

पेट्रोल जाणार १२० रुपयांवर?; मार्चमध्ये इंधनाची दरवाढ अटळ

vishwatmaklokswamivarta

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत जास्तीत जास्त सुविधा निर्मिती करावी-क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे