vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मध्य प्रदेश मध्ये महिलेने दिला 4 पाय असलेल्या नवजात बालकाला जन्म;  कमला राजा हॉस्पिटल मध्ये झाली प्रसुती

मध्य प्रदेश मध्ये महिलेने दिला 4 पाय असलेल्या नवजात बालकाला जन्म;  कमला राजा हॉस्पिटल मध्ये झाली प्रसुती…

 

मध्यप्रदेश प्रतिनिधी

मध्यप्रदेश मध्ये एका महिलेने दिला चार पायाच्या मुलाला जन्म बाळ सध्या विशेष दक्षता युनिटमध्ये मध्ये आहे. सध्या तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जात आहे.

 

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियार (Gwalior) मध्ये एका महिलेने चार पाय असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. Sikandar Kampoo मधील Aarti Kushwaha असं मातेचं नाव आहे. Kamla Raja Hospital, Women and Child Pediatrics Department मध्ये आरतीची प्रसुती झाली आहे. बुधवार 14 डिसेंबर दिवशी जन्माला आलेल्या या मुलीच्या प्रसुतीनंतर अनेकांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान नवजात बाळ सुदृढ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या मुलीचं वजन 2.3 किलो आहे. बाळाच्या जन्मानंतर ग्वालियरच्या जया आरोग्य ग्रुप च्या डॉक्टरांच्या टीमने देखील बाळाला तपासलं आहे.

Superintendent of Jayarogya Hospital Group Dr RKS Dhakad यांनी ANI ला दिलेल्य माहितीमध्ये नवजात मुलीला 4 पाय असल्याचं म्हटलं आहे. जन्मतः बाळाला ही शारिरीक विकृती आहे. काही भ्रूण एक्स्ट्रा असतात. त्यांना वैद्यकीय भाषेमध्ये Ischiopagus म्हणतात. जेव्हा गर्भ दोन भागात विभागला जातो तेव्हा शरीर दोन ठिकाणी वाढत असतं. नवजात मुलीच्या बाबातीत तिच्या कंबरेखालील भाग विकसित झाला आणि त्यामध्ये चार पाय म्हणजे 2 अधिकचे पाय वाढले. पण ते पाय कार्यान्वित नाहीत.

सध्या मुलीच्या शरीरात इतरत्र देखील अन्य काही शारिरीक विकृती आहेत का? याचं वैद्यकीय परीक्षण डॉक्टरांकडून केले जात आहे. जर बाळ उत्तम स्थितीमध्ये असेल तर तिचे दोन अन्य पाय शस्त्रक्रियेद्वारा काढले जातील. यामुळे ती इतर लोकांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकेल असे डॉक्टर धाकड म्हणाले

संबंधित पोस्ट

मान्यवरांच्या उपस्थितीत जालना गणेश फेस्टीव्हलचा शुभारंभहा वारसा पुढेही चालूच राहिल-राजेंद्र गोरे * या फेस्टीव्हलची उंची अशीच वाढत जावो-खा.काळे

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगाम 2023 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हाधिकारी म्हणुन आशिमा मित्तल यांनी स्विकारला पदभार…

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

पाणीटंचाई निवारणासाठी टँकर मंजुर…