
आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातही लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.
भाजप आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांचे पाठिमागील प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या आजारामुळे निधन झाले आहे. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातही लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.



