
हल्दवानीतील रेल्वेच्या जमीनीवरील घरे हटविण्यास स्थगिती देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय क्रांतिकारक – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले*
मुंबई . प्रतिनिधी उत्तराखंड मधील हल्दवानीतील रेल्वेच्या जमिनीवरील हजारो घरे रातोरात हटविणे योग्य नसून मानवतेच्या दृष्टिकोनातून असा निर्णय अन्यायकारक ठरेल. त्यामुळे हल्दवानीतील रेल्वेच्या जमिनिवरील सुमारे 4 हजार घरे हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई करणारा दिलेला निर्णय मानवतावादी;क्रांतिकारक ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी स्वागत केले असून सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
हल्द वानीतील रेल्वेच्या जमिनीवरील घरे 15 दिवसांत हटविण्याचा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन रातोरात घरे हटविणे मानवतेच्या दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मानवतावादी क्रांतिकारक आहे आशा शब्दांत ना.रामदास आठवले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले



