vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेना “नक्की कोणाची यावर आज नवी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी लेखी उत्तर सादर

“.शिवसेना ” नक्की कोणाची यावर आज नवी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली.  यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी लेखी उत्तर सादर…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

शिवसेना नक्की कोणाची यावर आज नवी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी लेखी उत्तर सादर केलं. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी या सुनावणी दरम्यान काय घडलं याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे

 

शेवाळे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगानं लेखी उत्तरासाठी ३० जानेवारी मुदत दिली होती, त्यानुसार आज दोन्ही गटांकडून लेखी उत्तर सादर करण्यात आलं. कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते, त्याला लेखी उत्तर देण्यात आलं आहे. यामध्ये आम्ही दोन गोष्टींवर भर दिला आहे की, शिवसेनेची घटना आणि पक्षाची मान्यता ही मतदानावर अवलंबून असते. त्यामुळं आमदार आणि खासदार किती आहेत यावर पक्ष अवलंबून असतो. हे मुद्दे आम्ही मांडले आहेत.

मुख्य नेता हे घटनात्मक पद – शेवाळेमुख्य नेता पद हे घटनात्मक आहे, हे आम्ही आयोगापुढं माडलं आहे. त्यानुसार आम्ही घटनात्मक पद निर्माण केलेलं आहे, असंही आम्ही सांगितलं. बाळासाहेबांनी जी शिवसेना बनवली त्यावेळीची घटना वेगळी होती, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना हाती घेतली त्यावेळी ती बदलण्यात आली. त्यामुळं बाळासाहेबांच्या मुळ घटनेप्रमाणं आम्ही आमचं सबमिशन केलं आहे. स्वेच्छेन पक्ष सोडल्याचा मुद्दाच नाहीए, त्यामुळं आम्ही शिवसेनेचं पक्षचिन्ह सोडण्याचा प्रश्न येत नाही, असंही यावेळी शेवाळे यांनी म्हटलं आहे.

अंतिम निकाल यायला वेळ लागणारलेखी युक्तीवाद सादर झाल्यानंतर अंतिम निकाल येण्यास काही दिवस लागणार आहेत. यामध्ये ठाकरे गटानं संध्याकाळी ४ वाजता आपलं ११२ पानांचं लेखी उत्तर निवडणूक आयोगाकडं सादर केला. तर शेवटच्या क्षणी युक्तीवाद करण्यात आला. त्यांनी ११४ पानांचं उत्तर आयोगाकडं सादर केलं आहे.

 

संबंधित पोस्ट

उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला भारतासह परदेशातही मिळणार Z+ सुरक्षा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सक्तीच्या धर्मांतराचा मुद्दा गंभीर, धर्मांतरामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि धर्म स्वातंत्र्यावर परिणाम होतो… सर्वोच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

ईव्हीएम, कागदपत्र ठेवलेल्या दोन्हीही स्ट्राँगरुम सुरक्षित; कडेकोट बंदोबस्त तैनात – जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी

आयपीएल 2023 चा थरार लवकरच सुरु होत आहे एडन मार्कराम सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना पिक कर्ज मदतीसाठी ‘शेतकरी सहाय्यता केंद्र’;30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

पीएम नरेंद्र मोदींनी संगममध्ये श्रद्धेने स्नान केले, गंगा मातेला आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta