vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल, महत्वाची सूचना…

 पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल, महत्वाची सूचना…

[ मुंबई प्रतिनिधी

: मुंबई महापालिकेवर  आपली सत्ता प्रस्तापित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गटाने आगामी निवडणुकीसाठई रणशिंग फुंकलंय. त्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद मोदी  यांना मैदानात उतरवल्याचं पहायला मिळतंय. भाजपने ‘मिशन मुंबई’चा प्लॅन आखला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक मनावर घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांचे मुंबई दौरे  वाढले आहेत. अशातच आज पंतप्रधान मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही मार्गात बदल केलेत.

 

पंतप्रधान मोदी आज सीएसएमटी ( स्थानकावरुन वंदे भारत एक्सप्रेसला  हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे वाहतूक कोंडी  टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) आणि मरोळमध्ये (Marol) मोदींचे कार्यक्रम असतील.

वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल –

ईस्टर्न फ्री वे (Eastern Free Way) मार्गावरची वाहतूक बंद करून, डी एन रोड आणि जे जे ब्रिजवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे सीएसटीला जाण्यासाठी जाण्यासाठी वाहनांनी ईस्टर्न फ्री वे मार्गाचा वापर केला जाणार नाही.

कुलाब्यातल्या बधवर पार्क,नेव्ही नगर आणि कफ परेडची वाहतूक मंत्रालयाकडून वळवण्यात आलीये. 2.45 ते 4.15 पर्यंत हे बदल करण्यात आले आहेत.

अंधेरी, घाटकोपर-कुर्ला रोडवरील मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने साकीनाका जंक्शन येथून जे. व्हि. एल. आर. रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जातील.

 

दरम्यान, मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून  उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं  उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता पोलीस यंत्रणा  देखील सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांकडून जवळपास 1000 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय.

संबंधित पोस्ट

खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे ‘खो-खो’ ला पाठबळ

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादनांना* *ठाणे, नवी मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणार* *मंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मालेगाव केस कमकुवत करू पाहात असल्याचा आरोप माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केला

vishwatmaklokswamivarta

लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

आघाडी किंवा युतीची चिंता तुम्ही करु नका! जनतेची कामं करा, उद्धव ठाकरे यांचे आदेश

आदिवासी समाजाच्या प्रगती व उत्थानासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील-आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाहीपुढील पाच वर्ष मतदारांची सेवा करण्याचा संकल्पआदिवासी बांधवांकडून आ. मुनगंटीवार यांचा जाहिर सत्कार..

vishwatmaklokswamivarta