vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपामध्ये प्रवेश….

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपामध्ये प्रवेश….

 

नाशिक प्रतिनिधी

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोचिठ्ठी दिली आहे. आजच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केला. नाशिक येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा पक्षप्रवेश झाला.

अभिनेत्री प्रिया बेर्डे  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोचिठ्ठी दिली आहे. आजच त्यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. प्रिया बेर्डे यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या दोनच वर्षांत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केला. नाशिक येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा पक्षप्रवेश झाला

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री अशी प्रिया बेर्डे यांची ओळख आहे. प्रदीर्घ काळ अभिनयात कारकीर्द गाजवल्यावर त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला (2020) सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले. अवघ्या दोनच वर्षात घड्याळ बाजूला ठेवत त्यांनी भाजपचे कमळ धरले. दरम्यान, प्रिया बेर्डे यांच्यासह इतरही काही अभिनेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे समजते. त्यांची नावे अद्याप पुढे आली नाहीत. याशिवाय इतरही काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला

संबंधित पोस्ट

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी…

vishwatmaklokswamivarta

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन,राज्यपालांकडून बाप्पाला निरोप

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

सरकारचा ‘रिमोट’ माझ्याच हातात’, मुख्यमंञ्यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीला इशारा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये अडीच लाख मतदार, 291 मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta