vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रासह 13 राज्यांना मिळाले नवे राज्यपाल…

महाराष्ट्रासह 13 राज्यांना मिळाले नवे राज्यपाल…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही राजीनामा दिला असून, त्यानंतर रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल  बनवण्यात आले आहे. त्याचवेळी राधा कृष्णन माथूर यांचा लडाखच्या लेफ्टनंट राज्यपालपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला असून अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ.बी.डी. मिश्रा यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आज अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून अनेकांमध्ये फेरबदल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही राजीनामा दिला असून, त्यानंतर रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Maharashtra New Governor) बनवण्यात आले आहे. त्याचवेळी राधा कृष्णन माथूर यांचा लडाखच्या लेफ्टनंट राज्यपालपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला असून अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ.बी.डी. मिश्रा यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक नवीन राज्यपालांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना सिक्कीमचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. सीपी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी आणि शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल –

राष्ट्रपती मुर्मू यांनी मणिपूरचे राज्यपाल एल.ए. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. तर बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.

गुलाबचंद कटारिया झाले आसामचे राज्यपाल –

राजस्थानचे माजी गृहमंत्री आणि सध्याच्या राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कटारिया हे राजस्थानमधील भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये ओळखले जातात.

नवीन राज्यपालांची यादी –

    • रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
    • लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
    • लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
    • सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
    • शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
    • गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसम
    • निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
    • बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़
    • अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर
    • एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
    • फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
    • राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
    • ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख

दरम्यान, केंद्र सरकारने न्यायमूर्ती (निवृत्त) एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वभूषण हरिचंदन यांना छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

संबंधित पोस्ट

मुंबईतील रुग्णालय अलर्ट; मुंबई महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय…

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराला महंमद युनूस जबाबदार ! शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या …

vishwatmaklokswamivarta

पाच फिल्म स्टुडिओला बेकायदेशीरपणे चालवण्याची परवानगी देणाऱ्या बीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

एडवोकेट  गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ संघटनेची स्थापना…

विक्रोळी, चेंबूरमध्ये दुर्घटना; मुसळधार पावसामुळे 17 बळी मुंबईवर मोठं संकट

ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात पोहोचतात-महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,रायगड जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta