vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विक्रोळी, चेंबूरमध्ये दुर्घटना; मुसळधार पावसामुळे 17 बळी मुंबईवर मोठं संकट

मुंबई : शनिवारपासून होत असलेल्या पावसामुळे विक्रोळी आणि चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे .आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश. अद्यापही या ठिकाणी आठ जण अडकले असल्यामुळे बचाव कार्य सुरू आहे.  घरांवर दरड कोसळल्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.

त्याचप्रमाणे, रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडलीये. पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत ढिका-याखालून 13 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे.

अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.. जखमींना राजावाडी तसंच जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलंय.. बजावकार्यासाठी NDRFची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर.

पुढील 10 तास राज्यात अतिमुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

वंदे मातरम्’‌ व ‘राज्यगीताने’ महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ विधिमंडळ विशेष अधिवेशन २०२४

vishwatmaklokswamivarta

डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला अत्याचार 22 जणांना ताब्यात घेण्यात आले इतर आरोपींचा शोध

vishwatmaklokswamivarta

भारत  पाकिस्तान सीमेवर असलेल्या काश्मीर खोऱ्यातील पुंछ गावात 12 वर्षांपासून गणेश उत्सव साजरा होत

केरळा येथे पी एफ आय: विरोधातील कारवाईचे हिंसक पडसाद; वाहनांच्या तोडफोडीसह भाजप कार्यालयावर हल्ला…

vishwatmaklokswamivarta