vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

इलेक्ट्रिकल,ओला इ स्कूटर चे तुफान बुकिंग, जगात बनविला रेकॉर्ड.

इलेक्ट्रिकल,ओला इ स्कूटर चे तुफान बुकिंग, जगात बनविला रेकॉर्ड.

प्रतिनिधी,अद्याप कंपनीने स्कूटरबाबत कोणत्याही स्पेसिफिकेशंसची घोषणा केली नाही. परंतु ज्यापद्धतीने कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय की, ही फक्त सुरुवात आहे.ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी शनिवारी ओला इलेक्ट्रीक स्कुटरच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. ओला इ स्कूटर ला 24 तासांत 1 लाखांहून अधिक बुकिंग मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचबरोबर ही स्कूटर जगातील सर्वाधिक आगाऊ बुकिंग मिळविलेली स्कूटर बनल्याचे ते म्हणाले.

ओला ईलेक्ट्रीकने 15 जुलै रोजी 499 रुपयांत स्कूटर बुक करण्याची घोषणा केली होती. याद्वारे कंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्कूटरची अपडेट देत राहणार आहे. अद्याप कंपनीने स्कूटची किंमत जाहीर केलेली नाहीय.

भारतातील ईव्ही क्रांतीची ओलाने स्फोटक सुरुवात केली आहे. जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांनी याचे आगाऊ बुकिंग केले आहे, असे अग्रवाल यांनी ट्विट केले आहे. आमच्या पहिल्याच ईव्ही वाहनाला मोठा प्रतिसाद दिल्याने उत्सुकता वाढली आहे. ग्राहक आता पर्यायी इंधनाकडे वळत आहेत, याची ही नांदी आहे, असे ते म्हणाले.

ओलाच्या या स्कूटरची विक्री या महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टपासून होण्याची शक्यता आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं बुकींग किंमत फक्त ४९९ इतकी ठेवली आहे. ही रक्कम पूर्णपणे रिफंडेबल असणार आहे असं ओलानं जाहीर केले आहे. म्हणजे ग्राहक जर बुकींग कॅन्सल करतील तर त्याला पूर्ण पैसे परत केले जातील. ओला इलेक्ट्रीक वेबसाईटवर जाऊन त्याची बुकींग करू शकता.

संबंधित पोस्ट

लोकसभा निवडणूक- 2024आचारसंहितेत उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू विक्री विरुद्ध फास…!एक महिन्यात 94 गुन्हे, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळापशुसंवर्धनातून उद्योजकता विकासाला चालना- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी ठाण्यात विशेष तपासणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 अंतर्गत प्राप्त निधी वेळेत खर्च करावा: पालकमंत्री पंकजा मुंडे· जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 करीता 514.96 कोटींचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta