vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

एडवोकेट  गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ संघटनेची स्थापना…

एडवोकेट  गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ संघटनेची स्थापना…

 

वकील गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांनी अखेर ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ (ST Kashtakari Jan Sangh) नावाची राजकीय संघटना (Political Organization) स्थापन केली आहे. आपण लवकरच एक संघटना स्थापन करणार आहोत, अशी माहिती सदावर्ते यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी आज आपल्या संघटनेची आणि तिच्या नावाची घोषणा अधिकृतपणे केली.

वकील गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांनी अखेर ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ (ST Kashtakari Jan Sangh) नावाची राजकीय संघटना (Political Organization) स्थापन केली आहे. आपण लवकरच एक संघटना स्थापन करणार आहोत, अशी माहिती सदावर्ते यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी आज आपल्या संघटनेची आणि तिच्या नावाची घोषणा अधिकृतपणे केली. मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचारी आंदोलन यांमुळे सदावर्ते हे जोरदार चर्चेत आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केलेली वक्तव्ये. कॅमेऱ्यासमोरचे त्यांचे वर्तन या सर्वच गोष्टीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी झालेल्या हल्ला प्रकरणी त्यांना अटक झाली. आता ते जामीनावर बाहेर आल्यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या आधीच म्हटले होते की, आता कष्टकरी माणसाचे नेतृत्व शेतातील बुजगावण्यांच्या हाती नसेल. कष्टकरी समाज आता स्वत:चीच माणसे निवडतील. आजवर या बुजगावण्यांनी कष्टकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याचे काम केले. आता ही परिस्थीती तशीच राहणार नाही. परिस्थिती नक्की बदलणार आहे. लवकरच आपण एका संघटनेची स्थापना करत निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचेही सदावर्ते यांनी म्हटले

मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते हे कोर्टात गेले होते. त्यामुळे त्याही वेळी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु झाले. कर्मचाऱ्यांनी संपक केला. या आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. इतकेच नव्हे तर या आंदोलनाचे नेतृत्वही अनपेक्षीतरित्या सदावर्ते यांच्याकडे आले. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडली. परंतू, त्यासाठी त्यांनी मोठी आर्थिक रक्कम वसूल केल्याचाही आरोप झाला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानी काही कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचे सूत्रधार सदावर्ते असल्याचा आरोप झाला आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रदीर्घ काळात पोलीस कोठडीत आणि न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर पुढे सदावर्ते यांना जामीन झाला. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.

 

संबंधित पोस्ट

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यपाल रमेश बैस यांना निरोप; नौदलातर्फे मानवंदना

vishwatmaklokswamivarta

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि परिवार बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम रितेश देशमुख फरहान खान अभिनेत्री  जेनेलिया यांनी मतदान केले…

vishwatmaklokswamivarta

एमएचटी-सीईटी -2024 या सामाईक प्रवेश परीक्षेचे जिल्ह्यातील 4 परीक्षा उपकेंद्रावर आयोजन

vishwatmaklokswamivarta

करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविणार- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबईमधील ३०० शाळा आणि महाविद्यालयांतील ६० हजार विद्यार्थ्यांना मिळणार करियर मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! / दीपावली की हार्दिक शुभकामनाएं !

vishwatmaklokswamivarta