vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशभरातील मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण, भाविकांनी केली पूजा…

देशभरातील मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण, भाविकांनी केली पूजा…

 

मुंबई प्रतिनिधी

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. या सणानिमित्त सकाळपासून भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे. करोना काळात बंद असलेली मंदिरं यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुली करण्यात आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. भाविकांकडून शिवमंदिरात शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत बाबुलनाथ मंदिर, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये तर कोकणात कुणकेश्वर येथील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भगवान शंकराची पूजा केली गेली.

माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला येणारी शिवरात्री ‘महाशिवरात्री’ म्हणून साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ‘शिवरात्री’ म्हणतात. दरवर्षी सुमारे १२ शिवरात्री येतात, या बारा शिवरात्रींमध्ये येणारी महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान शंकराने या दिवशी तिला पत्नी म्हणून स्वीकारले, असे सांगितले जाते. 

 

संबंधित पोस्ट

महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर ..

vishwatmaklokswamivarta

पुण्यात PFI च्या आंदोलनात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या नारेबाजी वरून आज भाजप पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची घेणार भेट

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ थाटात विकसित भारताचे ध्येय्य साकारण्यासाठी काम करा- राज्यपाल रमेश बैस

नियुक्त उमेदवारांनी शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यात अनुकंपा व लिपिक भरती नियुक्तीच्या 139 आदेशांचे वितरण- शासकीय संस्थांच्या बळकटीकरणाला गती देऊ 

उपमुख्यमंत्री यांची पुणे पुस्तक महोत्सवाला भेट,वाचन संस्कृती, विचार आणि विज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक महोत्सव उपयुक्त -देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :-थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta