
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात माध्यमांना बंदी…
कोल्हापूर प्रतिनिधी:
केंद्रीय तसंच राज्य पुरातत्व खात्यालाही त्याची दखल घ्यावी लागली. मात्र आता अंबाबाई मंदिरात माध्यमांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. आज वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माध्यमांनाच मंदिरात जाण्यापासून रोखलंय. मूर्ती संवर्धनाचा मुद्दा उचलल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदीचे आदेश निघाल्यानं यामागे नेमकं कारण काय याचीच सध्या चर्चा आहे
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कॅमेरा घेऊन बंदी करण्यात आली आहे. आज अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावरच माध्यमांना अडवण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसा आदेश काढल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्री अंबाबाईच्या मूर्तीचा मुद्दा समोर आला आहे. यावरुन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.
दरम्यान, अंबाबाईच्या मूर्तीची स्थिती नाजूक असल्याचे कोल्हापूरच्या माध्यमांनी समोर आणले होते. यानंतर पहिल्यांदा राज्य पुरातत्त्व आणि नंतर केंद्रीय पुरातत्त्वकडून पाहणी करण्यात आली आहे. मात्र, TRP साठी बातम्या दाखवल्या जात असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय पुरातत्त्वकडून पाहणी करताना मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप श्रीपूजकांच्या वकिलांनी केला आहे



