
बाबा बागेश्वर धाम चे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांचा आज मुंबई च्या मिरा रोड मध्ये दुसऱ्या दिवसाचा दिव्य दर्शनाचा कार्यक्रम…
मुंबई प्रतिनिधी
बागेश्वर बाबा काल पहाटेच मुंबईत दाखल झाले होते. मीरा रोड येथे त्यांनी पहिल्या दिवसाचा भाविकांना दर्शन देण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा पहिला दिवस पूर्ण पाडला असून आज दुसरा दिवस आहे सायंकाळी पाच वाजल्यापासून त्यांचा कार्यक्रम नियमानुसार चालणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळविण्यात येत आहे
दोन दिवसाच्या या कार्यक्रमात 18 तारीख शनिवार यांचा भव्य दिव्य कार्यक्रम लाखो लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मुंबई महाराष्ट्रातील अनेक राज्यातून अनेक भक्त आणि भाविकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होत यावेळी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आणि उपाय सुचविले
आज त्याचा दुसरा दिवस रविवार असे दोन दिवस त्यांचा कार्यक्रम होणार आहे.
सध्या बाबा बागेश्वर धामचे महंत देवेंद्र शास्त्री भाईंदर पश्चिम येथील श्री माहेश्वरी भवनात येथेच त्यांचा मुक्काम आहे. बागेश्वर बाबांना पाहण्यासाठी मिरा रोड येथील कार्यक्रम स्थळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
बागेश्वर बाबा ही देशभरात सध्या प्रचंड चर्चेत असलेली व्यक्ती आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनातील ओळखणे, अनोळखी माणसाची माहिती क्षणात सांगणे, अशा प्रकारचे चमत्कार करून दाखवण्याचे दावे बागेश्वर बाबा त्यांच्या दरबारात करत असतात. अशी माहिती बघता द्वारे देण्यात येत आहे मात्र बाबा बागेश्वर धामण स्वतः कोणताही चमत्कार करत नसल्याचा दावाही करत आहेत ते फक्त प्रार्थना करत असल्याचे सांगतात प्रार्थना करण्यात खूप मोठी शक्ती आहे याकरता सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे सर्व हिंदू धर्मियांना एकत्र करण्याचा त्यांचा मानस असल्याचे सूत्रांकडून कळत आहे देशभरातील त्यांच्या भक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय.
धीरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथे 2 दिवस होणाऱ्या दिव्य दर्शनाच्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे
आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात जवळपास 50 हजार ते एक लाखापर्यंत भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मिरा रोडच्या एस. के. स्टोन ग्राउंड येथे बागेश्र्वर धीरेंद्र शास्त्री यांचे दोन दिवसीय कार्यक्रम पार पडणार आहे. 18 आणि 19 मार्च रोजी संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत चालणार आहे.



