vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माहीम समुद्रातील दर्गा अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले

माहीम समुद्रातील दर्गा चे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने टाकले काढून…. कलेक्टर आणि महापालिकेची संयुक्त कारवाई…

 

मुंबई प्रतिनिधी

माहीम दर्गा बांधकाम प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली आहे. काल मुंबईतील गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर आज कारवाई करण्यात आली

 

माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्यावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या मदतीने अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. संवेदनशील प्रकरण असल्यानं ‘झी 24तास’ तोडकामाची दृश्य दाखवलेली नाहीत. मुंबई समुद्रातील माहीम दर्गा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. समुद्रातील मजार बांधलेली जागा मोकळी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ही मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. काल मुंबईतील गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी माहीम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता आणि कारवाईसाठी महिन्याची मुदत दिली होती. 

त्यानंतर रात्रीच जिल्हा प्रशासन जागे झाले आणि कारवाईचे आदेश दिले होते.

संबंधित पोस्ट

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

स्टँड-अप कॉमेडियन- कुणाल कामरा ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील एका हॉटेलची तोडफोड …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे     -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलिसांना बाजूला करा, .राणेंच्या घरात घुसून कोथळाच बाहेर काढतो, सेना आमदाराचा तोल ढळला