
चैत्र नवरात्री दरम्यान आज अष्टमी चा दिवस; मुंबईतील मुंबादेवीची संपन्न झाली आरती
मुंबई प्रतिनिधी
चैत्र नवरात्री दरम्यान आज अष्टमी चा दिवस आहे. या दिवसा निमित्त देवीचा जागर करत मुंबई शहराची देवता मुंबादेवी मंदिरामध्ये आरती संपन्न झाली आहे.
चैत्र नवरात्री दरम्यान आज अष्टमी चा दिवस आहे. या दिवसा निमित्त देवीचा जागर करत मुंबई शहराची देवता मुंबादेवी मंदिरामध्ये आरती संपन्न झाली आहे. भाविकांनी या आरतीला उपस्थिती लावली होती. आज सकाळी ही आरती संपन्न झाली आहे.
मुंबादेवीचे विशेष म्हणजे ही मुंबादेवी मुंबई नगरीची कुलदेवी आराध्य देवी असून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला उभा राहण्याचे सामर्थ्य आणि शक्ती नावलौकिक आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी माता असल्याचे संपूर्ण देशभरात या मुंबादेवी मातेची चर्चा असते मुंबईला आलं आणि मुंबादेवीचे दर्शन घेतलं नाही तर मुंबईचे दर्शन अपूर्ण असल्याचे येथील भक्त जन सांगतात यंदा सालाबादप्रमाणे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये भक्तांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लावून देवदर्शनासाठी येथे येत असतात हा देवदर्शनाचा लाभ सर्वांना होवो हीच मातेकडे इच्छा जय माता की



