vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राहुल गांधी मानहानी खटल्यातील शिक्षेला देणार गुजरात न्यायालयात आव्हान; प्रियंका गांधीही राहणार उपस्थित

राहुल गांधी मानहानी खटल्यातील शिक्षेला देणार गुजरात न्यायालयात आव्हान; प्रियंका गांधीही राहणार उपस्थित…

नवी दिल्ली प्रतिनिधी

काँग्रेस  नेते राहुल गांधी  आज सुरत दौऱ्यावर आहेत. सन 2019 मध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी दाखल खटल्यात राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मानहानीच्या या प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकारी आदेश रद्द करण्यासाठी राहुल गांधी सुरतच्या  न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आज सुरत दौऱ्यावर आहेत. सन 2019 मध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी दाखल खटल्यात राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मानहानीच्या या प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकारी आदेश रद्द करण्यासाठी राहुल गांधी सुरतच्या न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी मिळालेल्या शिक्षेवर अंतरिम स्थगिती देखील मागू शकतात. ज्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होण्याचा मार्ग मोकळा होईल.

दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत सूरतमध्ये बहीण प्रियंका गांधी वड्रा आणि अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि सुखविंदर सिंग सुखू हे काँग्रेस शासीत तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असणार आहेत, असे समजते. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी काल मातोश्री सोनिया गांधी यांची भेट घेतली होती

सूरतमधील एका कोर्टाने 52 वर्षीय राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सन 2019 मध्ये कर्नाटक राज्यातील कोलार येथून केलेल्या एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी फरारी उद्योगपतींवरुन टीका केली होती. तसेच, फरार झालेले सर्व गुन्हेगार मोदीच कसे आहेत? असा सवाल केला होता. यावरुन मोदी समाजाचा (?) अपमान केला असा ठपका राहुल यांच्यावर ठेवत खटला दाखल करण्यात आला होता.

 

संबंधित पोस्ट

पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये*कृषि विभागाचे आवाहन

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भांगशी माता गड विकासासाठी निधी देणार- पालकमंत्री सत्तार

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 5 कार्यकारी निरीक्षक व 2 भरारी निरीक्षक पथके कार्यरत…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

vishwatmaklokswamivarta

देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोहगाव येथील विविध विकासकामांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta