vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

ठाणे विभागातील मुरबाडमध्ये 38 वर्षीय डॉक्टरचे अपहरण करून 30 लाखांची खंडणी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक…

 ठाणे विभागातील मुरबाडमध्ये 38 वर्षीय डॉक्टरचे अपहरण करून 30 लाखांची खंडणी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक…

 

ठाणे प्रतिनिधी

38 वर्षीय डॉक्टरचे अपहरण करून त्याच्याकडून 30 लाख रुपये उकळल्याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मुरबाड पोलिसांनी सांगितले की, ही घटना गेल्या वर्षीची असून त्यांच्या पथकाने शनिवारी आरोपीला अटक केली

 

डॉक्टरचे अपहरण करून त्याच्याकडून 30 लाख रुपये उकळल्याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी (Murbad Police) पाच जणांना अटक (Arrest) केली आहे. मुरबाड पोलिसांनी सांगितले की, ही घटना गेल्या वर्षीची असून त्यांच्या पथकाने शनिवारी आरोपीला अटक केली. मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितलं की, 22 ऑक्टोबर 2022 रोजी डॉक्टर त्यांच्या स्कूटरवर जात असताना एका व्यक्तीने त्यांच्याकडून लिफ्ट घेतली.

काही अंतर पुढे गेल्यावर, आरोपीचा सहकारी तेथे आला आणि डॉक्टरांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांनी मुरबाड परिसरातील सरळगाव येथील जंगलात नेलं. तसेच डोळे झाकून मारहाण केली

पांढरे यांनी पुढे सांगितलं की, आरोपींनी डॉक्टरच्या पत्नीलाही फोन करून सोडण्यापूर्वी 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. घटनेच्या 25 दिवसांनंतर डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आमच्या तपास पथकाने गुन्ह्याच्या विविध अंगांनी काम केले. आम्ही विविध मोबाईल फोनच्या 2.50 लाख डेटा डंपचे विश्लेषण केले आणि आरोपींचे टॉवर लोकेशन मिळवण्यात यशस्वी झालो.

आरोपींचा शोध घेतला आणि शनिवारी त्यांना अटक केली. गुन्ह्यामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही. स्थानिक न्यायालयाने आरोपींना 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पांढरे यांनी दिली.

 

 

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची उल्लेखनीय कामगिरी…

vishwatmaklokswamivarta

गुंतवणुकीच्या नावाखाली गोंडस योजनांचे आमिष दाखवून 50 गुंतवणूकदारांना 4 कोटी रुपयांचा लावला चुना

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील  ऍडवोकेट नितीन सातपुते यांच्यावर तडीपार गुंडांचा हल्ला माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

मुंबईत १० कोटींचा गांजा जप्त – गुजरातमधील टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक: चुनाभट्टी पोलिस….

मुंबईतील देवनारमध्ये अमली पदार्थांचा मोठा पर्दाफाश: दोन दिवसांत ₹19.78 लाख किमतीचा 94.494 किलो गांजा जप्त

vishwatmaklokswamivarta

पोलिसांकडून 1.4 लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त, एकला अटक