
यूएस, यूके आणि कॅनडा यांनी पाकिस्तानमधील नागरिकांसाठी जाहीर केली ट्रॅव्हल अॅडव्हायझरी..
विदेश प्रतिनिधी
इस्लामाबाद येथील अमेरिकन दुतावासाने सध्या ते सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले
पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल अटक झाल्यानंतर देशात त्यांच्या समर्थकांनी देशात हिंसात्मक निदर्शने केली. यामुळे संपुर्ण देशात सध्या दंगलसदृश्य वातावरण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, इंग्लड आणि कॅनडा या देशांनी आपल्या नागरिकांसाठी ट्रव्हल अॅडव्हाझरी (Travel Advisory) जाहीर केली आहे. इस्लामाबाद येथील अमेरिकन दुतावासाने सध्या ते सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले, तसेच सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी करावी तसेच सोबत आपले ओळखपत्र ठेवावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत.



