vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून पोलिसांना बसला धक्का…

पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून पोलिसांना बसला धक्का…

[

मुंबई प्रतिनिधी: पिंपरी चिंचवडमध्ये  रेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये एक भोजपुरी अभिनेत्री आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या क्राइम ब्रांचला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मानवी तस्करी विरोधी पथकाने गुरुवारी एका व्यक्तीला बनावट ग्राहक बनवून पाठवलं होतं. हॉटेलमध्ये गेलेल्या ग्राहकाने देहविक्री सुरु असल्याच्या माहितीला दुजोरा दिल्यानंतर पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हॉटेलमधील रुमममध्ये छापा टाकून दोघींची सुटका करण्यात आली.

 

प्राथमिक तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, देहविक्रीमध्ये सहभागी असणाऱ्या एजंट्सनी या महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढलं होतं. पोलिसांनी एजंटला बेड्या ठोकल्या आहेत. तसंच कलम 370 (3) आणि 34 अंतर्गत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

“धाड टाकून ज्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे त्याच्यातील एक भोजपुरी अभिनेत्री असून दुसरी मॉडेल आहे. त्यांना वेगवेगळी आमिषं देण्यात आली होती. त्यांना 15 ते 25 हजार रुपये दिले जात होते. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे,” अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून भोजपुरी अभिनेत्रींची नेमकी काय भूमिका होती याची माहिती घेत आहेत.

संबंधित पोस्ट

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण, नागपुरातील त्या व्यक्तीला पोलीस कोठडी

पुण्यामध्ये कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

लहान मुलांच्या पाण्याच्या बाटलीत लपवण्यात आलं होतं पाच कोटींचं ड्रग्ज, मुंबईत महिलेसह दोघांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत परराज्यातील दारू,- ४ वाहनांसह ४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांच्या शिवाजीनगर शाखेने एमडी ड्रग्जसह 4 ड्रग्ज तस्कर आणि 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक

vishwatmaklokswamivarta

धक्कादायक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार…