vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या तत्परतेने दहशतवादाचा मोठा कट उधळून लावला आहे. रविवारी (21 मे) एनआयएने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केली

सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या तत्परतेने दहशतवादाचा मोठा कट उधळून लावला आहे. रविवारी (21 मे) एनआयएने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केली. मोहम्मद उबैद मलिक असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो कुपवाडा येथील रहिवासी आहे. उबेद पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैशच्या कमांडरच्या सतत संपर्कात होता. दहशतवादी उबेद जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट राबवण्याचा प्रयत्न करत होता. अटक करण्यात आलेला दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या आपल्या कमांडरला लष्कर आणि सुरक्षा दलांच्या हालचालींशी संबंधित माहिती पाठवत होता. एनआयएच्या तपासात असे समोर आले आहे की आरोपी दहशतवादी गुप्त माहिती, विशेषत: सैन्य आणि सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैश कमांडरला देत होता. एनआयएने आरोपींकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासंदर्भातील अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त केली आहेत

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून बेकायदेशीर खरेदी प्रकरण रद्द करण्याची शासनाकडे मागणी !सोमेश्वर देवस्थानानंतर श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे षड्यंत्र!* महाराष्ट्रातील अनेक हिंदू मंदिरांच्या जमीनी संकटात !

vishwatmaklokswamivarta

मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली

सण-उत्सव एकोप्याने साजरे करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा