
नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय अर्थ मंत्रालय जारी करणार 75 रुपयांचे स्मारक नाणे…
नवी दिल्ली प्रतिनिधी
भारतीय संसदेची नवीन इमारत लवकरच राष्ट्राला अर्पण केली जाईल. येत्या रविवारी म्हणजेच 28 मे रोजी इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडले. दरम्यान, याच कार्यक्रमाचे औचित्य साधत आरबीआय 75 रुपयांचे स्मारक नाणे जारी करणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.
केंद्रिय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नाणे गोलाकार असेल आणि ते 44 मिलीमीटर इतक्या व्यासाचे असेल. नाण्याच्या काठावर 200 रेषा असतील. हे नाणे मिश्रधातूंपासून बनलेले असेल. त्याच्यात चांदी, तांबे, निकेल आणि जस्त असे धातू पावरले जातील. या धातूंचे प्रमाणही ठरलेले आहे. या नाण्यात 50 % चांदी, 40 % तांबे, 5 % निकेल आणि 5 % जस्त जस्त असेल
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने माहिती दिली. पंचाहत्तर रुपयांच्या नाण्यावर संसद परिसर आणि नवीन संसद भवनाची प्रतिमा असेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. संसद भवनाच्या कार्यक्रमांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी 75 रुपयांचे नाणे हे देखील एक वैशिष्ट्यच मानले जात आहे. या आधीही विविध प्रसंगी अशा काही गोष्टी घडल्या आहेत. जसे की, एखाद्या विशेष कार्यक्रम, घटना अथवा कारणामुळे भारतीय डाक विभागाने पोस्टाचे तिकीटही काढले आहे.
नाण्यावर भारताची नवी संसद आणि संसदेचा परिसर असेल तर त्याच्या खाली आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये 2023 हे सालही कोरलेले असेल. हे नाणे ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असेल, असा विश्वासही केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला आहे.



