vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना: ओडिशातील बारगड जिल्ह्यात मालगाडी रुळावरुन घसरली,कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

 पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना: ओडिशातील बारगड जिल्ह्यात मालगाडी रुळावरुन घसरली,कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

 

 

ओरिसा प्रतिनिधी

ओडिशा राज्यातील बालासोर येथे घडलेल्या रेल्वे अपघाताच्या जखमा अजनही ताज्या असतानाच पुन्हा एकदा दुर्घटना घडली ओडिसा राज्यातील बारगड जिल्ह्यात एका मालगाडीचे डबे  रुळावरुन घसरले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही

राज्यातील बारगड (Bargarh) जिल्ह्यात एका मालगाडीचे डबे (Goods Train Derailed) रुळावरुन घसरले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, मालगाडी आणि त्यातील सामानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासास सुरुवात केली. मदत आणि बचाव कार्यही सुरु झाले आहे.

ओडिशा राज्यातील बरगढ जिल्ह्यातील मेंधापळी येथे ही घटना घडली आहे. रुळावरुन घसरलेली अपघातग्रस्त मालगाडी डुंगुरीहून बारगडकडे जात होती.चुनखडी घेऊन निघालेल्या या मालगाडीला सांबरधराजवळ अपघात घडला. गाडीचे अनेक डबे रुळवरुन घसरले. अधिक माहिती अशी की, चुनखडीच्या खाणी आणि बारगडच्या सिमेंट प्लांट दरम्यान खाजगी नॅरोगेज रेल्वे मार्ग आहे. हे मार्ग लाइन, वॅगन आणि लोको खाजगी असल्याने ते भारतीय रेल्वे प्रणालीशी जोडलेले नाहीत. त्यात मार्गावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

दरम्यान, भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातांपैकी एक, बालासोर जिल्ह्यात एकामागून एक तीन गाड्यां एकमेकांवर आदळल्याने घडलेला अपघात ताजा आहे. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा समावेश असलेला हा अपघात कोलकात्याच्या दक्षिणेस सुमारे 250 किमी आणि भुवनेश्वरच्या 170 किमी उत्तरेस बहनगा बाजार स्टेशनजवळ संध्याकाळी 7 च्या सुमारास झाला. यात 275 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले. तर 900 हून अधिक जखमी झाले आहेत

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान  विशेष लोकअदालत सप्ताह

सोयऱ्यां’चा समावेश’च नसलेल्या सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आंदोलन करण्यापूर्वी गंभीरपणे विचार करावा ः डॉ. संजय लाखेपाटील

vishwatmaklokswamivarta

निवडणूक विशेष लेख -: राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच…

vishwatmaklokswamivarta

जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांचा रावसाहेब दानवे यांच्याकडून सत्कार

दीपावली सणानिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु …

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta