vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बिपरजॉय या चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू होईल आणि ती मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील…हवामान खात्याचा इशारा

 बिपरजॉय या चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू होईल आणि ती मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील… हवामान खात्याचा इशारा

नवी दिल्ली प्रतिनिधी

जेव्हा चक्रीवादळ जोरदार वाऱ्यासह समुद्रात तसेच जमिनीवर प्रवेश करते, तेव्हा त्या स्थितीला लँडफॉल म्हणतात. या दरम्यान जोरदार वारे, मुसळधार पाऊस, समुद्राची पातळी वाढते.

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनार्‍याकडे सरकत असून, त्याने अतिशय धोकादायक रूप धारण केले आहे. कच्छच्या जखाऊ येथे आज आठच्या दरम्यान ते जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान खात्याने बिपरजॉयबद्दल चेतावणी जारी करताना म्हटले होते की, अत्यंत तीव्र चक्रीवादळ हे साडेचार वाजता जाखाऊ बंदर (गुजरात) पासून सुमारे 80 किमी दक्षिण-पश्चिमेस आणि देवभूमी द्वारकेच्या दक्षिणेस 130 किमी अंतरावर आहे. जखाऊ बंदराजवळ आज संध्याकाळपासून या चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू होईल आणि ती मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील.

जेव्हा चक्रीवादळ जोरदार वाऱ्यासह समुद्रात तसेच जमिनीवर प्रवेश करते, तेव्हा त्या स्थितीला लँडफॉल म्हणतात. या दरम्यान जोरदार वारे, मुसळधार पाऊस, समुद्राची पातळी वाढते. चक्रीवादळ जमिनीवर येण्याच्या काही तास आधी त्याचा प्रभाव दाखवू लागतो, त्यामुळे प्रभावित भागात पाऊस आणि वादळाचा सामना करावा लागतो.

 

संबंधित पोस्ट

मुंबईकरांच्या प्रत्येक कार्यालयात नेऊन जेवणाचा डब्बा पोहोचवणाऱ्या त्या डबेवाल्यांना, डबेवाला भवनासाठी जागाच नाही…?

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंडच्या  बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची 16 दिवसांनंतर मंगळवारी रात्री. बोगद्यातून सुटका केल्यानंतर सर्व कामगारांना सामुदायिक आरोग्य केंद्रात तपासण्यासाठी दाखल

vishwatmaklokswamivarta

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे विकसित भारत महिला उद्योजिका संमेलन

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध