
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार …
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि इतर प्रमुख नेते करणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते सदर माहिती पत्रकारांना देण्यात आली
या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि इतर प्रमुख नेते करणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्याउलट पालिकेत मनामानी कारभार मात्र सुरु आहे. महापालिकेचा पैसा अत्यंत मनमानी पद्धीतीने वापरला जातो आहे. पालिकेच्या कारभारावर कोणाचाही अंकूश नाही. हा सर्व प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांची उधलपट्टी आहे. त्यामुळेच हा जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, शिवसेनेचा काल वर्धापन दिन झाला. या वर्धापन दिनामध्ये जे बोलायचे ते मी बोललो. मात्र, प्रदीर्घ काळानंतर मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. मात्र, पाऊस जसा लांबणीवर पडला आहे. तशाच पद्धतीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. अशा स्थितीत लोकांची कामे कशी करायची हाच मोठा प्रश्न आहे. मुंबई महापालिकेवर कोणाचीह अंकूश नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या पैशांचा वारेमाप पद्धतीने वापर केला जातो आहे. अक्षरश: उधळपट्टी सुरु आहे. मुंबईला कोणी मायबापच राहिला नाही. त्यामुळे पालिकेची ही लूट थांबविण्यासाठी आम्ही एत्या एक जुलै रोजी मोठा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघेल, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले



