vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजायला सुरूवात झालीय.. सत्ताधारी एनडीए  विरुद्ध विरोधकांची ‘इंडिया’  आघाडी अशी समोरासमोर टक्कर…

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजायला सुरूवात झालीय.. सत्ताधारी एनडीए  विरुद्ध विरोधकांची ‘इंडिया’  आघाडी अशी समोरासमोर टक्कर…

 

[ बेंगलोर प्रतिनिधी:

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजायला सुरूवात झालीय.. सत्ताधारी एनडीए  विरुद्ध विरोधकांची ‘इंडिया’  आघाडी अशी समोरासमोर टक्कर होणाराय. भाजपला सत्तेवरून हटवण्याची रणनीती आखण्यासाठी बंगळुरूमध्ये  गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. काँग्रेसप्रणित यूपीएचं  नामोनिशाण मिटलंय. त्यामुळं आता इंडिया अर्थात  च्या झेंड्याखाली विरोधकांची वज्रमूठ भक्कम होतेय.

 

बंगळुरुमध्ये 17-18 तारखेला विरोधकांची बैठक पार पडली. बैठकीच्या पहिल्या दिवशी अनौपचारिक चर्चा झाली. तर बैठकीच्या दुसऱ्या दिवशी महागठबंधनाच्या नावावर चर्चा झाली. बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व पक्षांच्या नेत्यांना आघाडीसाठी नाव सुचवण्यास सांगण्यात आलं होतं. अखेर दुसऱ्या दिवसाच्या बैठकीत INDIA नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीला 26 पक्ष उपस्थित होते.

विरोधकांची वज्रमूठ… INDIA

काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, समाजवादी पार्टी, डीएमके, जेएमएम, आम आदमी पार्टी, शिवसेना उद्धव गट, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, आरएलडी, आईयूएमएल, केरळ काँग्रेस (एम), एमजीएमके, वीसीके, आरएसपी, केरळ काँग्रेस (जोसेफ), केएमडीके, अपना दल कमेरावादी, एमएमके, सीपीआईएमएल आणि एआईएफबी अशा 26 पक्षांचे नेते उपस्थित होते.

 

विशेष म्हणजे काँग्रेसनं पंतप्रधानपदावरची दावेदारी सोडलीय. पंतप्रधानपद किंवा सत्तेसाठी ही आघाडी नसल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्ट केलंय. तर आधी भाजपला सत्तेवरून दूर करूया, त्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू, असं मत नीतीश कुमारांनी व्यक्त केलंय.

पंतप्रधानपदावर दावा नाही – काँग्रेस

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानात काँग्रेसला रस नसल्याचं म्हटलं आहे. या बैठकीत आमचं उद्दीष्ठ सत्ता मिळवणं हे नाहीए, संविधान, लोकतंत्र, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं रक्षण करण्यासाठी ही लढाई असल्याचं मल्लिकार्जु खर्गे यांनी म्हटलंय.

अवघ्या वर्षभरावर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. त्यादृष्टीनं एनडीए विरुद्ध इंडिया अशा दोन्ही बाजूनं रणशिंग फुंकण्यात आलंय. आता प्रत्यक्ष रणमैदानात कोण कुणाच्या बाजूनं लढणार आणि घोडामैदान कोण मारणार, याची उत्सूकता देशातल्या जनतेला आहे…

संबंधित पोस्ट

आम्ही दहशतवाद्यांचा धर्म विचरला नाही, आम्ही दहशतवादाला लक्ष्य केले, नागरिकांना नाही आणि लष्करी तळांना ही नाही : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

रांजणगावला घोड धरणावरून नवीन पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावा-उपमुख्यमंत्री अजित पवार

दहीहंडीला परवानगी न दिल्यास सरकार विरोधात आंदोलन करणार, आशिष शेलार यांचा इशारा

बँकॉकला शक्तिशाली भूकंपाचा धक्का! इमारती कोसळल्या, लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा घाबरून पळून गेले, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सागिंगजवळ…

मोठी दुर्घटना, हळदी समारंभात महिला कोसळल्या विहिरीत; 13 जणींचा मृत्यू पुढील तपास पोलीस करत आहे 

vishwatmaklokswamivarta

75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त धारावीत  भारतीय जनता पार्टी मार्फत  झेंडावंदन करण्यात आला