vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी….

नवी दिल्ली प्रतिनिधी

संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेस आणि बीआरएसने मोदी सरकारविरोधात दोन वेगवेगळ्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रस्तावाची नोटीस मंजूर केली आहे. 

जनतेचा सरकारवरील विश्वासाला तडा जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर बोलावे अशी आमची इच्छा आहे, पण ते ऐकत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाची सूचना लोकसभेत मंजूर झाली आहे. प्रस्तावाच्या सूचनेला सभागृहातील आवश्यक 50 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी सकाळी ९.२० वाजता लोकसभेत महासचिवांच्या कार्यालयात अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली होती.

मणिपूरमध्ये ३ मेपासून हिंसाचार सुरूच आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींनी बोलण्यासाठी आणि या मुद्द्यावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तरानुसार सरकार चर्चेसाठी तयार आहे. मात्र मोदी बोलायला तयार नाहीएत. यामुळे विरोधात या मुद्द्यावर ठाम राहिले आहेत.

संबंधित पोस्ट

देशातील सर्वात मोठ्या बँक ची सूचना,SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! तुमचा संपूर्ण डेटा होतोय चोरी; चुकूनही करू नका,फेक ॲप डाऊनलोड…!

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी घेतला जगाचा निरोप…

विधानपरिषद लक्षेवेधी गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

एकही बाधित व्यक्ती मदतीपासूनवंचित राहता कामा नये- पालकमंत्री अब्दुल सत्तार वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्तांची पत्रपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर,विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस सरकारला महाविकास आघाडी सरकारची विधान परिषदेवरील 12 आमदारांची सुची मागे घेण्यास परवानगी

vishwatmaklokswamivarta