vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पाण्यापासून वंचित क्षेत्राला पाणी देण्यास शासन कटिबध्द- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

पाण्यापासून वंचित क्षेत्राला पाणी देण्यास शासन कटिबध्द- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

राज्य प्रतिनिधी पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

 

मिरज तालुक्यातील टाकळी येथील माधव मोहिते मळा येथे आयोजित पाणी परिषद शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहीत कोरे, मकरंद देशपांडे, काकासाहेब धामणे, टाकळी गावच्या सरपंच हिना नदाफ यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज तालुक्यातील 7 धडक उपसा सिंचन योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करून टाकळी, मालगाव परिसरातील पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच हा प्रस्ताव मार्गी लावू. शासनस्तरावरून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राचे तात्काळ सर्व्हेक्षण करून त्याचे अंदाजपत्रक सादर करावे. त्यानुसार शासन स्तरावरून आवश्यक कामासाठी निधीची मागणी करता येईल.

 

समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या मागण्या होवू लागल्या आहेत. टंचाईच्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी देण्यासाठी तयारी केलेली आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.

 

अधिक्षक अभियंता श्री. पाटोळे यांनी टाकळी, मालगाव भागातील वंचित क्षेत्राला पाणी देण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती देवून सद्यस्थितीत प्रस्ताव शासन स्तरावर असून मंजूरीसाठी आवश्यक ती सर्व पूर्तता केली जाईल, असे सांगितले. यावेळी मकरंद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

प्रास्ताविकात दयाधन सोनवणे यांनी पाणी परिषद आयोजित करण्याचा हेतू विषद करून टाकळी, मालगाव, बोलवाड भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राला लवकरात लवकर पाणी देण्याची मागणी केली. आभार काकासाहेब धामणे यांनी मानले.

 

पाणी परिषद शेतकरी मेळावा कार्यक्रमानंतर 15 लाख रूपये किंमतीच्या प्रजिमा 56 ते मालगाव संगाप्पा पाटोळे ते सुभाष चिप्परगे वस्ती रस्ता सुधारणा कामाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित पोस्ट

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्तेरोपे विक्री कक्षाचे उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राला दौऱ्यावर,शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. ‘महाप्रीत’च्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

vishwatmaklokswamivarta

भाजपचा जाहीरनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रसिद्ध:शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या; महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन…

vishwatmaklokswamivarta

वाल्मिकी नगरच्या झोपडपट्टीवासीयांना एस आर ए अंतर्गत मोफत घरे देण्याच्या योजनेला मुंबई विद्यापीठाचा विरोध

vishwatmaklokswamivarta