vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी..

कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी..

 

पुणे, प्रतिनिधी

पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणाऱ्या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी केली.

 

यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक, कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले आदी उपस्थित होते.

 

पिंपरी येथील मोरवाडी अजमेरा येथील भूखंड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास देण्यासंदर्भात गेल्या वर्षी करार झाला आहे. या भूखंडावर कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार कल्याणासाठी प्रकल्प राबविण्यात येणार असून या बहुउद्देशीय प्रकल्पाबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्र श्री.खाडे यांनी कामगार कल्याण मंडळाला दिले. यावेळी त्यांनी जागा हस्तांतरणाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती घेतली.

 

दरम्यान संभाजीनगर मधील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला तसेच जागा हस्तांतरण आणि प्रस्तावित उपक्रमाबाबत विविध सूचना केल्या.

 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. खोराटे यांनी जागा हस्तांतरणाबाबत माहिती दिली.

0000

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

vishwatmaklokswamivarta

महाज्योती’च्या लष्कर, युपीएससी व एमपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्जांना सुरुवात धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी-असे आवाहन ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केलेले आहे.

न्यू हायस्कूल सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न-प्रभात फेरीव्दारेही केली कायदेविषयक जनजागृती

vishwatmaklokswamivarta

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा- गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना-नवी मुंबई  क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच शुक्रवार दि. 07 मार्च 2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

नवी मुंबई महानगरपालिका:प्रसिध्दीकरिता,नमुंमपा शाळेतील पाचवी ते दहावीच्या 21 हजारहून अधिक विदयार्थ्यांनी उत्साहात केले ‘स्वच्छता मतदान’