vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आजपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी …

आजपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी …

 

मंत्रालय प्रतिनिधी

शिवसेनेच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून सुनावणी सुरू होत आहे

सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर अखेर प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुढील सुनावणीच्या वेळी वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या कारवाईला वेग आला आहे.

शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने तात्काळ एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी उपाध्यक्षांकडे अर्ज केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या 40 आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला. शिंदे गटाने आदित्य ठाकरे वगळता ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला होता. अशा प्रकारे 54 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय प्रलंबित आहे

संबंधित पोस्ट

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..

क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून चॅम्पियन्स चषक विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

भगवान महावीर अध्यासनासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पंतप्रधानांनी भाऊबीजेनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta