vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावेशालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सिटी हायस्कूला दिली भेट

कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सिटी हायस्कूला दिली भेट

 

         सांगली प्रतिनिधी : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज सांगली शिक्षण संस्थेच्या सांगली येथील सिटी हायस्कूला भेट देऊन संस्थाचालक यांच्याशी संवाद साधला व कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, संचालक नितीन खाडीलकर, हरी भिडे, विजय देवधर, केदार खाडिलकर, विपीन कुलकर्णी आदि उपस्थित होते.

 

सिटी हायस्कूलमध्ये संस्था चालक यांच्याशी संवाद साधताना शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपल्याला व्होकेशनल ट्रेनिंगवर भर द्यावा लागेल. शिक्षण संस्थांनी काही कोर्सेस डिझाईन केले पाहिजेत की, जेणकरून भावी पिढी बेरोजगार राहणार नाही. कौशल्यावर आधारित शिक्षण पध्दती निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था फार मोठे योगदान देवू शकतात. यासाठी शिक्षण संस्थांना एका वेगळ्या दिशेने वाटचाल करावी लागेल.आणि हीच वाटचाल शिक्षण संस्थानाही सक्षम बनवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

मुंबईतील लोकल रेल्वे ने प्रवास करणाऱ्या  नागरिकांची दोन डोस घेतलेल्यांना लोकल तिकीट देण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर–प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत

vishwatmaklokswamivarta

राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे• अहमदनगर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिर

vishwatmaklokswamivarta

पुण्यात आणखी हिट अ‍ॅण्ड रन! पुण्यात अज्ञात वाहनाची दोन पोलीस कॉन्स्टेबलना धडक; एकाचा मृत्यू…