vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न..

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न..

 

राज्य प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी हुदा उर्दु प्राथमिक विद्यालय, जालना येथे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

 

शिबीर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, मुख्याध्यापक उबेद अब्दुल रहेमान सिद्दिकी उपस्थित होते.

 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी उपस्थित विद्यार्थांना त्यांना समजेल अशा सोप्या शब्दात लैंगिक गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण कायदा समजावुन सांगितला. तसेच सदर कायद्यामध्ये शिक्षेचे प्रावधान आणि विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याबाबत सांगितले. तसेच मुलींच्या विविध प्रश्नांबाबत एक कमिटी स्थापन करण्याचे निर्देश दिले.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी आपला न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. मनामध्ये इच्छाशक्ती असली की आपण कोणत्याही पदापर्यंत पोहचु शकतो तसेच कोणत्याही गोष्टीला अगदी मनापासुन मिळवण्याचा ठरवलं तर ती गोष्ट ते ध्येय आपल्याला साध्य होवू शकते. तसेच विदयार्थ्यांना अभ्यास करतांना मोबाईल जवळ नाही ठेवला पाहिजे सर्व मन एकाग्र करून अभ्यास केला पाहिजे तसेच आयुष्याच्या वाटेवर कितीही कठीण प्रसंग आला तर त्याला तोंड देवून आपण आपल्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेटस वाटप करण्यात आले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सोलापूर बसस्थानाकावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!

vishwatmaklokswamivarta

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी

अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापना करून एक वर्ष झालं परंतु  उपायुक्त सहाय्यक आयुक्त एकूण 36 जागा भरल्या नाहीत ह्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावा अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी.

vishwatmaklokswamivarta

कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान; ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी तसेच जलसाठ्याची दुसरी प्रगणना वेळेत पुर्ण करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

वाघांच्या संवर्धनाबाबत आज जगभरात साजरा होत आहे ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन’;