vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर परिसरात स्वच्छता हीच सेवा या अभियानाचा पहिला टप्पा पार..

मुंबईतील सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर परिसरात स्वच्छता हीच सेवा या अभियानाचा पहिला टप्पा पार..

मुंबई प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याचे सहाय्यक अभियंता श्री.इरफान काझी यांच्या मार्गदर्शनात संगम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने तसेच ऑल इंडिया असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस च्या मुंबई प्रदेश चे सरचीटनीस श्री.तानाजी घाग यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एफ.उत्तर विभागाच्या घन कचरा व्यवस्थापन/ मुंबई पोलीस आणि/ अँटोप हील परिवहन विभागाशी पत्रव्यवहार करून या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.या अभियानात महानगरपालिकेच्या शाळेचे विद्यार्थी/रोटर्याकस क्लब केसी कॉलेज चे स्वयमासेवक/स्थानिक सामाजिक कार्यकर्ते/ योगा ग्रुप चे कार्यकर्ते/ प्रतीक्षा नगर जेष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला होता.

प्रतीक्षा नगर,प्रभाग क्रमांक 173 मधील माला गार्डन ते मराठा हॉटेल मार्गे मुख्य रस्त्यावरील दुतर्फा करून परत माला गार्डन अशी साफसफाई आणि गाड्या हटवून त्याच्या खालील कचरा गाळ माती शून्य कचरा करण्यात या अभियानाला यश प्राप्त झाले.

शाळकरी मुलांनी प्रभात फेरी काढून स्वच्छता हीच सेवा चे नारे लगावले तर तानाजी घाग यांनी मेघा फोन वरून जनजागृती केली. संगम प्रतिष्ठान च्या कोमल घाग यांनीही नागरिकांना स्वच्छ्ता आणि ऑड डे पार्किंग बाबत आव्हान केले.यावेळी महानगरपालिका एफ.उत्तर विभागाच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी हे अभियान यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.

हे अभियान उद्या दिनांक 27 रोजीही सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत प्रतीक्षा नगर प्रभाग क्रमांक 173 मधील मनपा शाळा ते बस डेपो मार्गे मोनोरेल जंक्शन फिरून सुंदर विहार हॉटेल मार्गे मनपा शाळेत सांगता होईल.या अभीयानास कायमस्वरूपी यशस्वी करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान के के सी चे सरचिटणीस तानाजी घाग यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

२४ कल्याण लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय निरीक्षकांना भेटण्याच्या वेळा जाहीर

गिरगाव चौपाटी गेट वे ऑफ इंडिया, आणि नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

व्यवस्थापन लेखांकन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न,तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वाची

मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे

vishwatmaklokswamivarta

मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक रद्द, आज ‘या’ मार्गावर असणार ब्लॉक