vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

कतार न्यायालयाने आठ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना सुनावली फाशीची शिक्षा; परराष्ट्र मंत्रालय देणार निर्णयाला आव्हान..

कतार न्यायालयाने आठ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना सुनावली फाशीची शिक्षा; परराष्ट्र मंत्रालय देणार निर्णयाला आव्हान..

 

विदेश प्रतिनिधी

भारत सरकार या माजी नौसैनिकांच्या सुटकेसाठी कायदेशीर पावले उचलत होते. या माजी भारतीय खलाशांनी एकेकाळी भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर काम केले आहे. सध्या ते दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या ओमानी नागरिकाच्या मालकीच्या सुरक्षा कंपनीत काम करत होते.

भारताच्या 8 माजी नौसैनिकांना  कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतार सरकारने गेल्या एक वर्षापासून या भारतीयांना कैदेत ठेवले होते. कतारमधील न्यायालयाने गुरुवारी (26 ऑक्टोबर) हेरगिरी प्रकरणात या कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो असून आम्ही सविस्तर निर्णयाच्या प्रतीची वाट पाहत आहोत. कतारी न्यायालयाच्या निर्णयावर भारत सरकारने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या निर्णयाला आव्हान देणार असल्याचेही भारताने म्हटले आहे.

 

यापूर्वी भारताने कतार सरकारला माजी भारतीय नौसैनिकांवर दया दाखवून त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले होते. हे भारतीय इस्रायलसाठी हेरगिरी करत होते, असा कतारचा दावा आहे.

भारत सरकार या माजी नौसैनिकांच्या सुटकेसाठी कायदेशीर पावले उचलत होते. या माजी भारतीय खलाशांनी एकेकाळी भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर काम केले आहे. सध्या ते दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या ओमानी नागरिकाच्या मालकीच्या सुरक्षा कंपनीत काम करत होते. त्यांचा दयेचा अर्ज आतापर्यंत अनेकदा फेटाळण्यात आला होता

कतारी न्यायालयाने दिलेला हा असा पहिलाच निर्णय आहे. कतारमध्ये या संपूर्ण घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका भारतीय पत्रकारालाही कतारच्या अधिकाऱ्यांनी तेथून जाण्यास सांगितले होते. तत्पूर्वी, कतारमधील भारतीय राजदूत आणि त्यांचे उपनियुक्त यांनी 1 ऑक्टोबर रोजी तुरुंगात या माजी नौसैनिकांची भेट घेतली होती. कतारने कधीही या भारतीयांवर केलेल्या आरोपांचा तपशील दिलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘आम्ही या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत. आम्ही ही बाब अत्यंत महत्त्वाची मानतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत

संबंधित पोस्ट

आता विवाहित महिलाही बनू शकतात मिस युनिव्हर्स; 2023 पासून लागू होणार ‘हा’ नवा नियम…

vishwatmaklokswamivarta

नेपाळमधील माऊंट  मनास्लू येथे हिमस्खलनात 2 गिर्यारोहकांचा मृत्यू, 12 जण जखमी…

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५० रुपये लीटर, अत्यावश्यक वस्तूही महाग

vishwatmaklokswamivarta

नायजेरियामध्ये मोठा नरसंहार; किमान 160 ठार आणि 300 जखमी- सूत्रांकडून माहिती

vishwatmaklokswamivarta

भारताची पहिलीने सर्वात पहिले स्वदेशी सर्वेक्षण नौका (एसव्हीएल)एनआयएस संधायक मलेशियातील क्लांग बंदराला भेट दिली

ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन 21 एप्रिलपासून गुजरातमधून सुरू करणार भारत दौरा; दुसऱ्या दिवशी घेणार पंतप्रधान मोदींची भेट