vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी:- “माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे हे समाजातील गरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठी लढणारे नेतृत्व होते. ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. विद्यार्थी चळवळीतून समाजकारणात सक्रिय असलेल्या बबनराव ढाकणे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची चिंता केली. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य, लोकसभेत खासदार, राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना प्रत्येक पदाला न्याय दिला. बबनराव ढाकणे हे लढाऊ नेतृत्व होत. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचे जीवन हे राजकीय, सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने संघर्षयोद्धा हरपला आहे. सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.

संबंधित पोस्ट

लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे डॉ. मुळे यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी स्वागत केले.

प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक प्रयोगात देशभक्ती –5000 व्यांदा उजळला इतिहास” मनोज सानप यांचा ऐतिहासिक प्रवास”

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-सहकारी संस्थांमध्ये विविध उपक्रमांव्दारे मतदार जनजागृती

vishwatmaklokswamivarta

प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी वाहनासाठी एमएच-11 डि व्ही मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा…

पिंपरी चिंचवड शहर जंगम समाज संस्थेचा १४ वा वर्धापनदिना निमित्त संस्था तसेच महिला आघाडी व युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

vishwatmaklokswamivarta