
उद्योजकांनी आस्थापनांची माहिती अद्ययावत करावी
सांगली, प्रतिनिधी : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या “महास्वयम्” (www.mahaswayam.gov.in) वेबपोर्टलवर मान्यताप्राप्त नोंदणीकृत खाजगी आस्थापनांची आयुक्तालयाच्या महास्वयंम पोर्टलचे एनसीएस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे. उद्योजक, नियोक्ते यांचा डाटा एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असताना उद्योजक, नियोक्ते यांच्या डाटामध्ये industrySector, First Name, LastName, Naturre Of Work, Id OrganisationPan/ Tan, City, Mobil No, Email Id, Contact No., Etc माहिती उपलब्ध नसल्याबाबत तांत्रिक तज्ज्ञ, महास्वयंम पोर्टल यांनी कळविले आहे. ही माहिती बहुतांश उद्योजक, नियोक्ते यांची अपूर्ण असल्याने एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असताना अडचण येत आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयाने दिलेला युजर आयडी व पासवर्डचा वापर करुन आस्थापनांची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
वेबपोर्टलबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली. (फोन नं. ०२३३-२९९०३८३) येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.
00000



