vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शेतकऱ्यांनी विविध कृषी औजारासाठी पंचायत समितीमध्ये 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत

शेतकऱ्यांनी विविध कृषी औजारासाठी पंचायत समितीमध्ये 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत

 

 

जालना, प्रतिनिधी : जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद उपकर योजना सन 2023-24 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कृषी औजारे पुरविण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी औजारे मागणीसाठी संबंधित पंचायत समितीमध्ये दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले आहे.

 

कृषी औजारामध्ये एच.पी.ओपनवेल सबमर्सिबल विद्युत पंपसंच, कडबाकुटी विना विद्युत मोटार, ट्रॅक्टर चलित औजारात पल्टीनांगर व पेरणी यंत्र, ब्लोअर, रोटाव्हेटर आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी स्वत:च्या नावे सातबारा व वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपर्यत असावे. असे कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-

संबंधित पोस्ट

सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल ! – सनातन संस्थेची भूमिका…

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे-शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

राज्यातल्या दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्रीडा विभागाला निर्देश.

Konkan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, मुसळधारपावसामुळे रुळांवर माती

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण