vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे दुसरे योगशिक्षक संमेलन महायोगोत्सव संपन्न..

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे दुसरे योगशिक्षक संमेलन महायोगोत्सव संपन्न..

जालना (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे दुसरे योगशिक्षक संमेलन महायोगोत्सव 2023 नुकतेच प. पु. जनार्दन स्वामी यांच्या कर्मभुमीत डॉ. हेडगेवार स्मृती मंदीर रेशिमबाग मैदान नागपुर येथे पार पडले.

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, राज्य महासचिव अमित मिश्रा आणि सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत बारा सुत्री मागणी पत्र महाराष्ट्र शासनाकडे संघटनेच्या वतीने पाठविण्यात आले. महाराष्ट्र राज्यात योग आयोग स्थापन करण्यात यावा यासाठी ठराव मंजूर करण्यात येवून तसा प्रस्ताव देखील महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जालना टिमकडून कार्यक्रमात तांडव नृत्य आणि आकर्षित वेशभुषा सादर करण्यात आली. या नृत्यामुळे मान्यवर आणि योग शिक्षक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी जेष्ठ योग साधक अनंत वाघमारे, शाम जोशी, मनोज लोणकर, गीता कोल्हे, जालना जिल्हाध्यक्षा शिल्पा शेलगांवकर, राज्य प्रवक्ता भाग्यश्री पाटील, मराठवाडा विभाग प्रमुख अंजली देशपांडे, बालकुमार चाटला, देवा चित्राल, पद्मा वल्लाकट्टी, स्वप्नजा खोत, अंकुश गाढे, ज्ञानेश्वर तिवारी, मनीषा सदावर्ते, नंदिनी कमळे पाटील, पुजा आर्य सोनाली चाटला, विद्या खिल्लारे, विद्या सानप, नवीन वलकट्टी, गीता लखापती अस्या एकूण 40 योग साधकांनी नागपूर येथील रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात दोन दिवसीय सम्मेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

संबंधित पोस्ट

आज नववा दिवस मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली…

vishwatmaklokswamivarta

कलिना संकुलामधील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कृषी दिनानिमित्त शहरात ‘ग्रीन बुलडाणा मिशन’

श्रीगणेशोत्सवाच्या राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबईत 3 सप्टेंबरला भव्यतम ‘कलागणेश महोत्सव’

vishwatmaklokswamivarta

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी…

vishwatmaklokswamivarta

राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस