vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या मुंबईत खारघरमध्ये केंद्रीय संचार ब्युरोमार्फत मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

नव्या मुंबईत खारघरमध्ये केंद्रीय संचार ब्युरोमार्फत मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

 

केंद्र सरकारच्या विविध सरकारी योजना, उपक्रम यांची माहिती मिळवण्याची संधी

 

रायगड प्रतिनिधी- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने नवी मुंबईतील लिटल वर्ल्ड मॉल, खारघर येथे मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून येथे येत्या 7, 8 आणि 9 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.

 

सदर मल्टीमीडिया प्रदर्शनात केंद्र सरकारमार्फत गेल्या 9 वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहिती चित्रे आणि डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येईल. भारतीय टपाल विभागांच्या विविध योजना आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षसंदर्भात माहितीही यामध्ये मिळेल. सोबतच स्थानिक तहसील कार्यालयामार्फत मतदार नोंदणी शिबीरही यावेळी राबवण्यात येईल.

 

पनवेल आणि खारघर परिसरातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळून त्याचा लाभ घेता यावा, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. मल्टीमीडिया प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून खारघर, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मुंबईतील दादर नक्षत्र मॉल मध्ये आयनॉक्स मुव्हीज थेटर मध्ये कामगारावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सह्याद्री मजदूर सभा आणि भाजपा चेंबूर विधानसभा अध्यक्ष राहुल वाळंज यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन

राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

वाशिम येथे माणगाव-पुणे महामार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत

उत्तर प्रदेशमध्ये 2022 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.भाजपला पराभूत करण्यासाठी निवडणुकीच्या  शिवसेनेची लढवणार 403 जागांवर निवडणूक

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतला आढावा*