vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अलिबाग बीच शो’चा शानदार शुभारंभआ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन..

अलिबाग बीच शो’चा शानदार शुभारंभआ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन..

 

अलिबाग प्रतिनिधी । अलिबाग समुद्र किनार्‍यावर आयोजित ‘अलिबाग बीच शो’चे रविवारी (5 नोव्हेंबर) शानदार उद्घाटन पार पडले. आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या संगीतमय सोहळ्याची सुरुवात झाली. स्थानिक कलाकारांनी नृत्य, गायनाने उपस्थितांची मने जिंकली. तर प्रसिद्ध आगरी हास्यकलाकार जॉनी रावत यांनी या सोहळ्याची रंगत वाढवली.

अलिबागमध्ये दर शनिवार-रविवारी लाखो पर्यटक येत असतात. आलेल्या पर्यटकांना जास्तीत जास्त आनंद मिळवून देण्याकरिता ‘आरटी’ फाऊंडेशन तर्फे दर शनिवार, रविवारी सायंकाळी अलिबाग समुद्रकिनार्‍यावर ही सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या उपक्रमाची सुरुवात रविवारी ‘मराठी रंगभूमी दिनी’ दिमाखदार सोहळ्याने झाली.

आ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी आरसीएफ कंपनीचे जनरल मॅनेजर संजीव हरळीकर, आरसीएफ कंपनीचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, कामगार नेते दिपक रानवडे, काँग्रेसचे नेते हर्षल पाटील, अर्जुन पाटील, ज्येष्ठ वकील अ‍ॅड.विलास नाईक, शेकाप नेते दत्ता ढवळे, कार्यक्रमाचे आयोजक राजन वेलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

स्थानिक गायक, नृत्यकलाकारांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तर प्रसिद्ध आगरी हास्यकलाकार जॉनी रावत यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लहर उठवली. सूत्रसंचालक प्रतिम सुतार आणि योगेश पवार यांनी कार्यक्रम रंगतदार केला. अलिबाग समुद्रकिनार्‍यावर रंगलेल्या या सोहळ्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद देत, भरभरुन दाद दिली.

या उपक्रमाद्वारे स्थानिक संस्कृती जपताना स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव दिला जाणार आहे. तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या पर्यटकांना त्यांची कला सादर करण्याकरिता खुला मंच उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

संबंधित पोस्ट

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी मोठे ब्लॉक घेण्यात येणार: मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती ..

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

मुंबईकरांसाठी खुशखबर : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी, आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

vishwatmaklokswamivarta

पीपल्स एज्युकेशन सोसायटी ला 500 कोटी निधी देण्याचा राज्य सरकार चा निर्णय स्वागतार्ह ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीला उस्फुर्त प्रतिसाद 6 हजार 542 प्रकरणे निकाली…

डोंगरी महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे*-पालकमंत्री शंभूराज देसाई*