vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विशेष तपासणी मोहिमेत 2186 दोषी खाजगी प्रवासी बसेसवर कारवाई..

विशेष तपासणी मोहिमेत 2186 दोषी खाजगी प्रवासी बसेसवर कारवाई..

 

 

             मुंबई, प्रतिनिधी: गणेशोत्सव काळात राज्यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसची 6 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 2186 दोषी आढळलेल्या खाजगी बसेसवर कारवाई करून एकूण 93.96 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्के अधिक राहणार नाही, अशा पद्धतीने कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. मात्र शासनाने विहीत केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी तपासणी करून दोषी वाहनांविरूद्ध प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाई करतात. तसेच क्षेत्रीय कार्यालयातील वायुवेग पथकांमार्फतसुद्धा कारवाई करण्यात येते.

 

राज्यात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत 41 हजार 234 अवैध प्रवासी वाहतूक करणारी खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 11 हजार 148 वाहने दोषी आढळले. या कारवाईत 440.26 लक्ष इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच 207 परवाने निलंबित करण्यात आले, असल्याचे . परिवहन आयुक्त सुभाष धोंडे यांनी कळविले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

श्री स्वामी समर्थ मठ कांजूरमार्ग पश्चिम चे संस्थापक अध्यक्ष आणि अखिल भारतीय माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश कुराडे हे भांडुप पश्चिम म. क्र. १५७ या विधानसभा मतदासंघांतून उमेदवारी अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांची धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

नवी मुंबई महानगरपालिका* बेगर निराशीत नागरिकांसाठी नवी मुंबईत घणसोली येथे बेघर निवारा केंद्र कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन -कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी होणार सहभागी

vishwatmaklokswamivarta

सुरत आणि करमाळे प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे चालवणार स्पेशल फेस्टिव्हल ट्रेन, जाणून घ्या सविस्तर..

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *केवळ हस्तांदोलन टाळणे पुरेसे नाही; भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करा !* – हिंदु जनजागृती समितीची पुणे व अहिल्यानगर येथील आंदोलनाद्वारे मागणी** आतंकवाद आणि क्रिकेट एकत्र होऊ शकत नाही !*

vishwatmaklokswamivarta