vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

 

 

 

पुणे, प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने वाहतूक नियमांच्या उल्लंघनासंदर्भात प्रलंबित असलेल्या चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा, येरवडा येथे शनिवार ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणाचा निपटारा होण्याच्यादृष्टीने आणि वाहतूक चलनांचे तडजोडीनंतर दंडातील मिळू शकणाऱ्या सवलतींबाबतबी माहिती सर्वांना मिळण्याकरिता २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत वाहतूक शाखा, येरवडा येथे मदत कक्ष (हेल्पडेस्क) सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पडेस्कच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग केलेल्या वाहनावर चलनांची निर्मिती तडजोडीअंती सूट देवून करण्यात येणार आहे.

 

सर्व संबंधितांनी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा पोष्ट कार्यालयाशेजारी, पुणे येथे उपस्थित राहून आपापल्या प्रकरणांचा निपटरा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल एस. पाटील यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अटक केलेली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून त्यावरून शरद पवारांना टोला नारायण राणे 

संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर ते अयोध्या आराम, ईलेक्ट्रीकॅल्स, शिवशाही बस सेवा सुरु करा-बाबासाहेब कोलते 

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी समाज कल्याण कार्यालयात हेल्पलाईन कक्ष सुरू

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी संवेदनशील भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार तात्काळ स्थलांतर करण्याच्या मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या सूचना

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनुकंपा नियुक्ती* *गरजू कुटुंबांच्या घरात एका क्षणात परतला आनंद*