vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी ओझर येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद

 मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी ओझर येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’!

 

     राज्य प्रतिनिधी  ओझर (पुणे) – मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. तरी मंदिरांचे जतन, संवर्धन आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन होण्यासाठी श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपती मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 आणि 3 डिसेंबर 2023 यादिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने एक मंत्री उद्घाटन सत्राला उपस्थित राहील, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या प्रसंगी श्री विघ्नहर ओझर गणपति मंदिराचे अध्यक्ष श्री. गणेश कवडे, श्री लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र बिडवई, श्री भीमाशंकर मंदिराचे अध्यक्ष श्री. सुरेश कौदरे यांसह सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचीही वंदनीय उपस्थिती होती.

 

या वेळी श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून 635 हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत. यात मुख्यत्वेकरून ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन, ‘झी’ 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक श्री. नीलेश खरे, श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी, राज्याचे माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, पुणे येथील पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक श्री. विलास वहाणे यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, यासह देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर, पैठणचे नाथ मंदिर, गोंदवले येथील श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथील गणपतीपुळे मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिर, अंमळनेर

अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आदी मंदिरांचे विश्वस्त, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.’’

(संपर्क : 70203 83264)

संबंधित पोस्ट

सत्ता मिळाल्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार : पुष्कर धामी

मुंबई ड्रग्स केस प्रकरण,आता या प्रकरणाचा तपास NCBकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडे सोपवण्यात येणार असल्याचे सूत्रांची माहिती.

vishwatmaklokswamivarta

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी! नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली; बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू, अग्निशामक दल पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित

मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधांचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश