
आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची अखेरची संधी..!सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदारयादीमध्ये आहे किंवा नाही याची तपासणी करावी
ठाणे, प्रतिनिधी :- मा. भारत निवडणूक आयोगाकडील दि.29 मे 2023 रोजीच्या निर्देशानुसार 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
निवडणुका न्याय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. त्यानुषंगाने दि.२७ ऑक्टोबर ते दि.०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आजच आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही, याची मतदारांनी खात्री करून घ्यावी. तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्तींचे मतदारयादीत नावाची नोंद नसल्यास नमुना नंबर ६, ज्या मतदारांच्या नावात/पत्त्यात दुरूस्ती असल्यास नमुना नंबर ८ तसेच कुटूंबातील एखादी व्यक्ती मयत / कायमस्वरुपी स्थलांतरीत असल्यास नमुना नंबर ७ भरण्यात यावा.
दिनांक 09 डिसेंबर 2023 पर्यंत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, मतदार नोंदणीकरीता ही अखेरची संधी असल्याने सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.
0000000000



