vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

 

राज्य प्रतिनिधी

: दौंड येथील स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. दौंड तालुक्यातील मागण्यांवर विचार करून तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटनानंतर झालेल्या  शेतकरी मेळाव्यात केले.प्रांत कार्यालय उद्घाटन, तालुका क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन, दौंड – गोपाळवाडी रस्त्याचे भूमिपूजन मंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार ॲड. राहुल कुल, जयकुमार गोरे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार  अरुण शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया आदी उपस्थित होते.

श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकास करत आहे. सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून त्याबाबत सुरू असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला आवर्जून भेट देऊन नागरिकांनी योजनांची माहिती घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

ॲड. कुल यांच्या पाठपुराव्यामुळे दौंड प्रांताधिकारी कार्यालय शासनाने मंजूर केले. भविष्यातही तालुक्याच्या मागण्यांवर कार्यवाही केली जाईल. तालुका क्रीडा संकुलामुळे खेळाडू मुलांचा फायदा होणार असून येथील मुलांनी ऑलिम्पिक स्तरापर्यंत यश मिळवावे. क्रीडा संकुल प्रकल्प उत्कृष्ट प्रकारे पूर्ण करावा, असेही महसूल मंत्री म्हणाले.

आमदार ॲड. कुल म्हणाले, स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरू झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना इतरत्र जाण्याचा त्रास, खर्च, वेळ वाचणार आहे. तालुक्यात विविध विकासकामे सुरू आहेत. तालुका क्रीडा संकुलाचेही उत्कृष्ट काम केले जाईल. जिल्हा न्यायालयाला जावे लागायचे आता वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर झाल्यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे. अष्टविनायक मार्ग, रेल्वेमुळे दौंडचे दळणवळण गतिमान झाले आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित पोस्ट

गावागावात वंचित युवा आघाडीच्या शाखांची मजबूत बांधणी (जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या प्रोत्साहनाने युवकांमध्ये संचारले नवचैतन्य

vishwatmaklokswamivarta

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल- पत्नीविरोधात दाखल याचिका फेटाळली.

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार 9 महिला सरपंचांचा समावेश

भारताचा ऐतिहासिक विजय!-🙌🇮🇳इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ५८ वर्षांनी ३३६ धावांनी पराभव करून इतिहास रचला

मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदी शिवसेना(उबाठा)चे किशोर गारोळे विजयी

vishwatmaklokswamivarta