vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भिवंडी निजामपूर मनपातील प्रभारी सहायक आयुक्तांच्या विभागीय चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार- मंत्री उदय सामंत

भिवंडी निजामपूर मनपातील प्रभारी सहायक आयुक्तांच्या विभागीय चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार- मंत्री उदय सामंत

 

राज्य प्रतिनिधी: भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील प्रभारी सहायक आयुक्तांची विभागीय चौकशी सुरू असून त्याचा अहवाल १५ दिवसांच्या आत मागविण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

 

सदस्य नीलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

 

मंत्री श्री. सामंत म्हणाले, सोमनाथ सोष्टे यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्र.५ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला असताना नाले व गटार सफाई करण्याकरिता मजुरांचे वेतन देण्याकरिता त्यांनी घेतलेल्या अग्रिमाचा ताळमेळ सादर केलेला नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास महानगरपालिकेमार्फत दिलेल्या नोटिसीचा खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांच्या मासिक वेतनातून दरमहा रक्कम कपात करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशास अनुसरून कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी सदस्य रईस शेख, प्रशांत बंब, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले.

 

000

 

श्री. दीपक चव्हाण/विसंअ/

संबंधित पोस्ट

वीर शहीदाच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित न राहिल्यास त्याचा पुतळा तोडणार- लोकेन्द्र साहू..

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सर्वेक्षणाचा नवा विक्रम..

नायलॉन मांजाचा घाऊक व किरकोळ विक्री आणि साठा न करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच, 21, 22 फेब्रुवारीला.

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक २०२४-मतदानाचे महत्व स्वतः ओळखा आणि इतरांनाही सांगा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी देवगिरी महाविद्यालयात युवकांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसाठी,चार हजार कोटींच्या रोख्यांची विक्री…अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

vishwatmaklokswamivarta