vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मीरा भाईंदर शहरांच्या विकास आराखड्यातील सुधारणांबाबत बैठक घेणार- मंत्री उदय सामंत..

मीरा भाईंदर शहरांच्या विकास आराखड्यातील सुधारणांबाबत बैठक घेणारमंत्री उदय सामंत

 

नागपूर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहराची प्रारूप विकास योजना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहराच्या स्थानिक गरजा विचारात घेऊन काही सुविधांचा, बदलांचा अंतर्भाव करणे आवश्यक असल्यास त्याबाबतच्या सूचना तपासून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

 

सदस्य प्रताप सरनाईक यांनी याअनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

याबाबत माहिती देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले, मीरा भाईंदर शहराची प्रारूप विकास योजना १९९७ साली मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर २०१५ साली यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने नगर रचना अधिकारी यांनी महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व शासकीय विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक आयोजित करून आणि स्थानिक गरजा विचारात घेऊन सुचविलेले आरक्षण आदी बाबी विचारात घेऊन विकास योजना तयार केली. ही योजना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असून मीरा भाईंदर महानगरपालिकेने काही सुविधांचा / बदलांचा अंतर्भाव करण्याची विनंती केल्यानुसार त्याची गुणवत्ता विचारात घेऊन योजनेत समावेश करण्याबाबत अहवाल सादर करण्याबाबत संचालक, नगर रचना यांना कळविण्यात आले असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले. या अनुषंगाने लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याबाबत विनंती करण्यात येईल असे सांगून सुधारित योजनेत आरक्षण बदलण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय-पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना

vishwatmaklokswamivarta

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

पाशा पटेल यांचा ‘हरित नायक’ पुरस्काराने सन्मान

आकर्षक कापडी राख्यांतून पर्यावरणाशी बंधूभाव जपणारा ‘इकोफ्रेंडली रक्षाबंधन’ उपक्रम नवी मुंबई महापालिकेत उत्साहात साजरा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावरील सीसीटीव्ही फूटेज जारी; पोलिसांची 8 पथकं आरोपींच्या मागावर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन