vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय-पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना

पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय-पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना

 

          राज्य प्रतिनिधी  पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

पुनर्रचनेनंतर पशूसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय असे या पदाचे नाव राहील. राज्यातील 351 तालुक्यांत तालुका पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरु करण्यात येईल. त्याचप्रमाणे 169 तालुक्यात तालुका लघू पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरु करण्यात येतील. राज्यातील 2 हजार 841 पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येईल. त्याशिवाय 12 हजार 222 नियमित पदांना व कंत्राटी तत्वावरील 3 हजार 330 पदे यांच्या वेतनासाठी 1681 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

सुशासन सप्ताह” अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथेजिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न-दैनंदिन कामकाजाच्या माध्यमातून कार्यालयाची उत्तम प्रतिमा निर्माण व्हायला हवी-निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर पाटील

vishwatmaklokswamivarta

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

vishwatmaklokswamivarta

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

vishwatmaklokswamivarta

गोवर्धन गोवश सेवा केंद्र योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक गोशाळा संस्थांनी अर्ज करावेत

नागरिकांनी “एक गाव एक गणपती”संकल्पनेनुसार शांतता व सौहार्दपूर्ण  वातावरणात उत्सव साजरा करावा” _पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड