vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आकर्षक कापडी राख्यांतून पर्यावरणाशी बंधूभाव जपणारा ‘इकोफ्रेंडली रक्षाबंधन’ उपक्रम नवी मुंबई महापालिकेत उत्साहात साजरा…

आकर्षक कापडी राख्यांतून पर्यावरणाशी बंधूभाव जपणारा ‘इकोफ्रेंडली रक्षाबंधन’ उपक्रम नवी मुंबई महापालिकेत उत्साहात साजरा…

          नवी मुंबई प्रतिनिधी  दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात उत्साहात साज-या होणा-या रक्षाबंधन सणाला पर्यावरणशील स्पर्श देणारा ‘इको-फ्रेंडली रक्षाबंधन’ हा अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात उत्साहात संपन्न झाला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पामध्ये बनविण्यात आलेल्या कापडाच्या आकर्षक राख्यांचे वितरण महानगरपालिकेतील महिला – अधिकारी, कर्मचारी यांना करण्यात आले.

            केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत वस्त्र समितीच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेसमवेत ‘वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्प (Textile Recycling Facility )’ देशात पहिल्यांदाच सीबीडी बेलापूर येथे राबविण्यात येत आहे. याठिकाणी नागरिकांनी वापरलेले सुस्थितीतले टाकाऊ कपडे ठिकठिकाणाहून संकलित करुन त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते व त्यापासून शोभिवंत उपयोगी वस्तू व कापड तयार करुन पुनर्वापरासाठी उपयोगात आणले जाते.

            या अनुषंगाने रक्षाबंधनाचा सण लक्षात घेऊन प्रकल्पस्थळी विविधरंगी आकर्षक कापडी राख्या बनविण्यात आल्या असून त्याचा प्रचार सर्वत्र होण्यासाठी महापालिका मुख्यालय व आठही विभाग कार्यालये याठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉल्सची व त्या अनुषंगाने वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची माहिती जनतेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रसारित होण्याकरीता ‘इकोफ्रेंडली रक्षाबंधन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असल्याचे याप्रसंगी बोलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांनी सांगितले

  यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व श्रीम. स्मिता काळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, कार्यकारी अभियंता श्रीम. शुभांगी दोडे, सहा.आयुक्त श्रीम. अलका महापुरकर, श्रीम. स्वरुपा परळीकर, श्रीम.शिल्पा देशपांडे व प्रकल्प संचालक श्री. प्रकाश सैनी आणि संयोजक श्री. सोनावणे आदी मान्यवरांच्या हस्ते कापडी राख्यांचे मोठया संख्येने उपस्थित महिला अधिकारी, कर्मचारी यांना वाटप करण्यात आले.

   या प्रकल्पांतर्गत 250 हून अधिक सोसायट्यांमध्ये वापरलेले सुस्थितीत कपडे संकलीत करण्यासाठी संकलन पेट्या ठेवण्यात येत असून त्यामधे जमा झालेले कपडे गोळा करुन प्रकल्पस्थळी आणले जातात व त्यांची आठ प्रकारे वर्गवारी करण्यात येते. त्या कपडयांवर त्यांच्या स्वरुपानुसार पुनर्प्रक्रिया करण्यात येऊन त्यापासून धागे वेगळे काढले जातात व नवीन कापड तयार करण्यात येते तसेच त्यामधील विविधरंगी कपड्यापासून इतर अनेक उपयुक्त वस्तू बनविल्या जातात. विशेष म्हणजे या प्रकल्पाव्दारे बचत गटातील महिलांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.

 त्यामुळे या रक्षाबंधन सणाला वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण केलेल्या आकर्षक कापडी राख्यांचा उपयोग करण्यासाठी त्या नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात व मुख्यालयात स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलवर कापडी राख्यांप्रमाणेच प्रकल्पस्थळी बनविलेल्या विविध आकर्षक वस्तूही ठेवण्यात आलेल्या आहेत. तरी महिलांनी आपल्या नजिकच्या विभाग कार्यालयाला भेट देऊन त्याठिकाणच्या इकोफ्रेंडली राख्या आपल्या भावांच्या हातावर बांधण्यासाठी घेऊन पर्यावरणाशीही बंधुभाव जपावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहेत

संबंधित पोस्ट

शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा**शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची दक्षता घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

स्वतंत्र सेनानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील चर्मकार समाजातील स्वर्गीय गुणाबाई गाडेकर यांचे पुत्र ज्येष्ठ नागरिक दिगंबर गाडेकर यांच्या राहत्या घरी श्रद्धा भेट

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार

ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

पीकस्पर्धेत सहभाग घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन