vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

1 सप्टेंबर रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन 

1 सप्टेंबर रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

नवी मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.

लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळाच्या (Website) मुख्यपृष्ठावर जलद दुवे (Quick Links) आयकॉनवर उपलब्ध असून सदर अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते. तसेच महानगरपालिका मुख्यालय इमारत, माहिती व जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से.15 ए, किल्ले गांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथूनही नागरिक अर्ज नमुना प्रत विनामूल्य उपलब्ध करून घेऊ शकतात.

अर्ज करताना नागरिकांनी शासन निर्णयानुसार अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे याची दखल घ्यावयाची आहे. तसेच अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने लोकशाही दिनात अर्ज दाखल करण्यापूर्वी संबंधित विषयाबाबत विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे व त्याच्या प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक असेल. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक – आस्थापना विषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावयाची आहे.विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर त्याचप्रमाणे यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा – सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा..

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

vishwatmaklokswamivarta

कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे  वाटप

वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये887

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन